Sunday, April 26, 2020

बारा मोटेची विहीर - 12 Pulleys Well - Historic Stepwell in Maharashtra, India

बारा मोटेची विहीर
पुण्यापासून साधारणपणे १०० किमी अंतरावर, साताऱ्याच्या १०-१५ किमी अलीकडे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर डावीकडे लिंब - गोवे नावाचे एक गाव आहे. ही बारा मोटेची प्रसिद्ध विहीर ह्याच गावात आहे. विहिरीवर असलेल्या बारा मोटांमुळे तिला हे नाव मिळाले आहे. ११० फूट खोल आणि ५० फूट व्यास अशी तिची व्याप्ती आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.  ह्या विहिरीमध्ये एक छोटी बैठकीची खोली देखील आहे. ह्या खोलीतून बाहेर येण्या-जाण्यासाठी दोन बाजूंनी चोर दरवाजे आहेत.  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या खोलीचा वापर गुप्त बैठकांसाठी होत असे. सतराव्या शतकात बांधलेली ही विहीर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. ह्या विहिरीचा २०१५ साली बनवलेला व्हिडिओ तुम्ही यूट्यूब वर खालील लिंक वर क्लिक करून बघू शकता. 

12 Pulleys Well.
About 100 km from Pune, 10-15 km before Satara, on National Highway no. 4, on the left is a village called Limb-Gove. This famous well of 12 pulleys is in this village. The name is due to the twelve pulleys on the well. It is 110 feet deep and 50 feet in diameter. There are steps to get down to the well. This well also has a small meeting room. There are secret doors on both sides to get out of this room. According to locals, the room was used for secret meetings. Built in the seventeenth century, the well is still in good condition. You can watch the video of this well made in 2015 by clicking on the following link on YouTube.